दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”

अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आज भाजपा आमदार नितेश राणेंनी या प्रकरणाबद्दल बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख केलाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधताना नितेश राणेंनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा उल्ले्ख करताना राज ठाकरेंसंदर्भातील एका प्रकरणाचाही संदर्भ दिलाय.

महापौरांना टोला…
“एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरी पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की यापुढे दिशा सालियन प्रकरणावर बोलू नका. पण महापौर काही तिथे थांबल्या नाहीत. त्यांना राज्य महिला आयोगाला पत्रही लिहिलं. त्याचबरोबर त्या काल जाऊन त्या दिशा सालियनच्या कुटुंबियांना भेटल्याही,” असं म्हणत नितेश राणेंनी मुंबईच्या महापौरांवर टीका केलीय.

आदित्य ठाकरेंवर टीका…
पुढे बोलताना नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंचासंदर्भ देत टीका केलीय. “याच महापौरांनी काही महिन्यांअगोदर त्यांच्या युवराजांना पेंग्वीन म्हणतात याची घोषणाही करुन टाकली. आता महापौरताईंचा हा सगळा उत्साह कदाचित अदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षात केलेल्या ४५ वर्षांवरील लोकांना तिकीट मिळणार नाही या छुप्या घोषणेमुळे तर नाही ना?, या दिशा सालियन प्रकरणामध्ये राजकारण हे शिवसेनेच्या अंतर्गत सत्ता संघर्षामुळेच आहे,” असा टोला नितेश राणेंनी लगावलाय.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e