पीकविम्याची 25 टक्के भरपाई आगाऊ द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे ओरिएंटल इन्श्युरन्सला आदेश

  जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी जोर धरत असताना पंतप्रधान पीकविमा योजनेतील खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची टक्केवारी पुढे आली आहे. सोयाबीन, मका, मूग, भात, उडीद, भुईमूग, बाजरी, कापूस, ज्वारी या पिकांच्या उत्पादनात गेल्या सात वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक घट येणार आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात विमा नुकसान भरपाईच्या २५ टक्के आगाऊ रक्कम जमा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी ओरिएंटल इन्श्‍युरन्स कंपनीला दिले आहेत
निफाड, नाशिक, चांदवड, सिन्नर, दिंडोरी, मालेगाव, देवळा, बागलाण, नांदगाव, येवला या तालुक्यांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेतील घटीची टक्केवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचनेद्वारे जारी केली आहे. कृषी आणि पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पाहणी केली. जिल्ह्याच्या सर्वदूर यंदाच्या पावसाळ्यात खूप कमी पाऊस झाला आहे. अवर्षण प्रवण क्षेत्राच्या पूर्व भागातील खरीप पिकांना झळा मोठ्या प्रमाणात बसल्या असून, पिके करपू लागली आहेत. काही भागात पिके वाळली आहेत. कळवण, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पेठ या तालुक्यांत काही प्रमाणात पाऊस झाल्याने या तालुक्यातील सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. या भागातील सर्वेक्षण झाल्यावर अंतिम अहवाल जारी केला जाईल. जिल्ह्यातील पाच लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे.सर्वाधिक नुकसान नांदगावमध्येजिल्ह्यातील ५५ महसूल मंडळांमध्ये सलग २१ दिवसांपासून पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वाधिक नुकसान हे नांदगाव तालुक्यात झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. त्यापाठोपाठ मालेगाव, चांदवड, येवला, बागलाण, सिन्नर आदी तालुक्यांचा क्रमांक लागतो. नाशिक तालुक्यातील मखमलाबाद आणि सातपूर मंडलातील उडीदचे, रायपूर (ता. चांदवड) मंडलातील सोयाबीन व बाजरी, तर दुगाव मंडलातील मका, उमराणे (ता. देवळा) मंडलातील मूग पिकाच्या उत्पादनातील घट १०० टक्के ठरलेली आहे. करंजगव्हाण (ता. मालेगाव) मंडलातील बाजरीच्या उत्पादनात १२३.२१ टक्के घट होणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे."जिल्ह्यात गेल्या २१ दिवसांपासून पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. विमा कंपनीला मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत."- विवेक सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (नाशिक)
पीकनिहाय उत्पादनात येणारी घट(आकडे मंडलनिहाय किमान आणि कमाल टक्क्यांमध्ये दर्शवितात)- निफाड : सोयाबीन : सायखेडा (५३.८९)- लासलगाव (६८.२९), मका : सायखेडा (५२.०४)- लासलगाव (६३.६३).- नाशिक : सोयाबीन : महिरावणी (५६.०३)- शिंदे (६३.८४), भात : मखमलाबाद (५०.५१)- पाथर्डी (६१.३२), मूग : माडसांगवी (६१.८२)- नाशिक (७३.४४), भुईमूग : महिरावणी (६९.२१)- भगूर (७४.९४), उडीद : गिरणारे व महिरावणी (प्रत्येकी ५३.८८), मखमलाबाद आणि सातपूर (प्रत्येकी १००).- चांदवड : सोयाबीन : वडनेरभैरव (७०.५१)- रायपूर (१००), मका : धोडंबे (७०.६७)- दुगाव (१००), मूग : वडनेरभैरव (९०.३३), दुगाव व शिंगवे (प्रत्येकी ९८.२१), बाजरी : वडाळीभोई (५३.२८)- रायपूर (१००), भुईमूग : धोडंबे (५९.३५)- दुगाव व शिंगवे (प्रत्येकी ९९.०१).- सिन्नर : सोयाबीन : पांढुर्ली (७४.९६)- पांगरी (८८.०४), मका : पांढुर्ली (७५.१४)- वडांगळी व वावी (प्रत्येकी ८९.३१), भुईमूग : पांढुर्ली (७१.३७)- शहा (८४.२०), बाजरी : पांढुर्ली (७२.९१)- सिन्नर (८५.९४).-दिंडोरी : सोयाबीन : उमराळे (६४.८२)- मोहाडी (७८.६६), नागली : ननाशी मंडल (५१.७९).- मालेगाव : मका : सौंदाणे (६५.९८)- झोडगे (७२.५२), बाजरी : कळवाडी (७८.२२)- करंजगव्हाण (१२३.२१), कपाशी : कळवाडी (५४.४२)- वडनेर (६१.२२), ज्वारी (७ मंडल) : वडनेर (७९.९२)- झोडगे (८७.८८), भुईमूग : मालेगाव व दाभाडी (प्रत्येकी ५७), कौळाणे, निमगाव, सायाने, कळवाडी, जळगाव (प्रत्येकी ६०.६५).- देवळा : मका : लोहोणेर (५५.९९)- खर्डे (९१.६०), बाजरी : लोहोणेर (५७.१०)- खर्डे (९३.३९), मूग : लोहोणेर (६४.९३)- उमराणे (१००), तूर : उमराणे (६९.४३)- देवळा (६९.७०), भुईमूग : खर्डे (८६.३६)- उमराणे (९०).- बागलाण : मका : मुल्हेर (४५.०३)- ब्राह्मणगाव (९७.११), बाजरी : वीरगाव (५१.०२)- ब्राह्मणगाव (९५.९९), भुईमूग : वीरगाव (३७.८६)- डांगसौंदाणे (७९.९१).- नांदगाव : मका : जातेगाव (८८.५९)- बाणगाव (९६.७४), बाजरी : मनमाड (८९.७०)- बाणगाव (९८.०७), कपाशी : हिसवळ (८२.९५)- नांदगाव (९८.७९), मूग : मनमाड (९४.५३)- नांदगाव (९९.१८मका : जातेगाव (८८.५९)- बाणगाव (९६.७४), बाजरी : मनमाड (८९.७०)- बाणगाव (९८.०७), कपाशी : हिसवळ (८२.९५)- नांदगाव (९८.७९), मूग : मनमाड (९४.५३)- नांदगाव (९९.१८), भुईमूग : मनमाड (८८.८९)- नांदगाव (९९.६२).- येवला : मका : पाटोदा (५३.७८)- नगरसूल (६३.४२), बाजरी : अंदरसूल (४७.४३)- पाटोदा (६८.७२), कपाशी (३ मंडल) : नगरसूल व राजापूर (प्रत्येकी ६१.९२), अंदरसूल (६२.४१), मूग : सर्व मंडलात (६३.५३), भुईमूग : पाटोदा, येवला, सावरगाव (प्रत्येकी ५७.४५)- राजापूर, नगरसूल, अंदरसूल (प्रत्येकी ५९.९९).

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e