पूजा सोळंके असं महिलेचे नाव आहे. महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून जीवन संपवलं आहे. मुक्ताईनगर येथे राहणाऱ्या पूजा रक्षाबंधनासाठी मुक्ताईनगरहून आपल्या पतीसोबत डोंबिवलीला आपल्या नंदेकडे आली होती.
नंदेच्या घरी राहत असताना पतीसोबत काही कारणावरुन वाद झाला. या वादानंतर महिलेने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
मुक्ताईनगर येथे पूजा सोळंके ही आपल्या पतीसह राहते. आठ महिन्यापूर्वी तिचे लग्न झाले होते. पूजा रक्षाबंधनानिमित्त नंदेकडे आली होती. दरम्यान तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्याला पूजाने इमारतीच्या चौथा मजल्यावर उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या माहिती मिळतेच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची आत्महत्या
0 Comments