युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा आक्रमक पवित्रा; मित्रराष्ट्रांनी शस्त्रात्रं पाठवल्याची दिली माहिती

युक्रेनविरुद्ध रशियाची लष्करी मोहीम अद्यापही सुरू आहे. रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला आणि सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या आणि स्फोटांचा आवाज आला. या युद्धात शेकडो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाच्या या कृतीमुळे युरोपमध्ये व्यापक युद्धाची भीती निर्माण झाली आहे आणि त्याचवेळी ते थांबवण्यासाठी जगभरातून प्रयत्न सुरू झाले आहेत.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांची संपत्ती लवकरच जप्त केली जाऊ शकते. २७ देशांची युरोपियन युनियन या संदर्भात कराराच्या अगदी जवळ पोहोचली आहे. लक्झेंबर्गचे परराष्ट्र मंत्री जीन एसेलबोर्न यांनी शुक्रवारी हा दावा केला. तसेच युक्रेन सरकारने शुक्रवारी दावा केला की, रशियाने पिवडेनीच्या काळ्या समुद्रातील बंदराजवळ दोन विदेशी जहाजांवर गोळीबार केला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e