विरार : शनिवारी सकाळी १० च्या सुमारास वसई पूर्व नवघर येथील एका गारमेंट कंपनीच्या गोदामला आग लागली आहे. ही आग विझविण्यात पालिकेच्या अग्नीशमन विभागाला यश आले आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गोदामातील सर्वच माल जळून खाक झाला आहे. आगीचे नमके कारण कळले नसली तरी आग विजेच्या शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन विभागाने वर्तविला आहे.
वसई पूर्व नवघर येथे असलेल्या व्हिक्टोरी रेडिमेट शर्ट बनविण्याच्या कंपनीत पहिल्या मजल्यावर गाळा क्रमांक ८ येथे सकाळी अचानक धूर निघू लागल्याने कामगारांनी वसई विरार महालिकेच्या अग्नीशमन विभागाला आग लागल्याची वर्दी दिली. अग्नीशमन विभागाचे कर्मचारी पोहचपर्यंत स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण काही क्षणातच आगीचा भडका उडल्याने सदराची इमारत खाली करण्यात आली. अग्निशमन विभागाने तीन पाण्याचे बंब आणि १२ जवानांनी आगवर अर्ध्यातासानंतर आगीवर नियंत्रण मिळवत आग विझवली. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले.
0 Comments