भारत रत्न लता मंगेशकर यांचे रविवारी ६ फेब्रुवारी २०२२ रोजी निधन झाले . त्यांच्या निधनाबाबत केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने आज सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेने आजपासून सुरु होणारी पतधोरण समितीची बैठक एक दिवस पुढे ढकलली आहे. आज बँक ऑफ महाराष्ट्रसह प्रमुख बँकांचे कामकाज बंद राहणार आहे भारतरत्न मिळालेल्या लता मंगेशकर या पंचतत्वात विलीन झाल्या. लता मंगेशकर यांना सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आली. त्यांच्यावर (लता मंगेशकर) पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी लता मंगेशकर यांचे पार्थिव त्यांच्या घरी 'प्रभू कुंज' येथे नेण्यात आले होते. भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी बहिणीला मुखाग्नी दिला. त्यानंतरच्या विधी हृदयनाथ यांच्या मुलाने आदिनाथ मंगेशकरांनी केले.
0 Comments