यशवंत जाधव यांच्या घरी सलग चौथ्या दिवशीही आयकर विभागाची छापेमारी सुरुच

 शिवसेनेचे मुंबई (Mumbai) महापालिकेमधील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याची (Income tax department) सध्या कारवाई सुरु आहे. मागील ४ दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. या दरम्यान, या ४ दिवसांच्या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांच्या नेमके हाती काय लागले ते आजून देखील गुलदस्त्यामध्येच आहे. या छापेमारीत या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसंचा (police) मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Income tax department raids Yashwant Jadhav house fourth day row)

या दरम्यान, यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्वीट (Tweet) देखील केले आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्याविषयी १८ ऑगस्ट २०२१ दिवशी आयकर विभाग आणि ईडी (ED) कडे तक्रार दाखल करण्यात आली होती, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. यानंतर आज सलग चौथ्या दिवशी देखील आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम तिथेच आहे.

मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगाव मधील घरी ही कारवाई सुरू आहे. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरी देखील आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवर आयकर विभागाने छापा टाकून कारवाई केली आहे. जानेवारी महिन्यामध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. मुंबईत कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e