BAMU विद्यापीठ लाच प्रकरणी डॉ. उज्वला भडंगे यांचं निलंबन, कुलगुरुंचं आश्वासन, लवकरच पत्र काढणार

कुलगुरुंच्या कक्षात आंदोलनकर्त्यांनी सदर लाच मागणाऱ्या विभागप्रमुखांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. उज्वला भडंगे यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. 

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील (BAMU) शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला भडंगे (Dr. Ujjwala Bhadande) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलगुरूंनी दिले आहे.  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांनी यासंदर्भातील अश्वासन पत्राकारांसमोर दिले असून तसे लेखी पत्रही तत्काळ काढण्यात येईल, असे सांगितले आहे.  पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीला 25 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून यासंदर्भातील ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती. विद्यापीठातील अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, यासाठी सर्व पक्षीय संघटनांनी आज तीव्र आंदोलन केले. त्यानंतर कुलगुरुंच्या कक्षात आंदोलनकर्त्यांनी सदर लाच मागणाऱ्या विभागप्रमुखांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली. त्यानंतर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी डॉ. उज्वला भडंगे यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभाग प्रमुखांविरोधात तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव आहे अंजली घनबहाद्दर. अंजली या खुलताबाद येथील डॉ. झाकीर हुसैन कॉलेजमधील प्राचार्य डॉ. शेख फेरोज यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत होत्या. मात्र विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला भडंगे यांनी अंजली आणि तिच्यासोबत शिकणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीकडून 25 हजार रुपये प्रत्येकी अशी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. डॉ. उज्वला भडंगे यांच्याशी फोनवर झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिपदेखील अंजली यांनी माध्यमांना तसेच पोलिसात दिली होती. त्यानंतर सदर प्रकरणाची मोठी चर्चा होऊन अशा प्रकारे लाच मागणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली. अखेर विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

ऑडिओ क्लीप व्हायरल, आंदोलन तीव्र

पीएचडीची विद्यार्थिनी अंजली घनबहाद्दर यांनी डॉ. उज्वला भडंगे यांच्याशी फोनवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लीप पोलिसांत दिली. तसेच बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये याविरोधात तक्रारही दाखल केली होती. औरंगाबाद विद्यापीठ परिसरात ही क्लिप प्रचंड व्हायरल झाली, तशी विद्यापीठातील अशा प्रकारांना आळा घातलाच पाहिजे, अशी मागणी तीव्र होऊ लागली. आज या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी जोरदार आंदोलन केले. तसेच कुलगुरुंच्या कक्षातही आंदोलकांनी ही मागणी लावून धरली. त्यानंतर डॉ. भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e