केद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबाबत अपशब्द काढले असून, त्यांचे वक्तव्य हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन नाभिक समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी समाजबांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सुरत येथे अखिल भारतीय जिवा सेना गुजरात राज्य यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले की, एका कार्यक्रमात राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवर टीका करताना मंत्री दानवे यांनी न्हावी समाजाबाबत अपमानजनक वक्तव्य केले. हा सकल नाभिक समाजाचा अपमान असून, मंत्री दानवे यांच्यावर गुन्हे दाखल करावे. समाज अशा प्रकारचा अपमान सहन करणार नाही. गुन्हे दाखल न केल्यास नाभिक समाज राज्यभर आंदोलन हाती घेईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती सुरत जिल्हा अधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. या प्रसंगी अखिल भारतीय जिवा सेना संस्थापक अध्यक्ष सुकदेव महाले , गुलाबजी वरसाळे.एम.एस.अहिरे ,आदि मान्यवर उपस्थित होते
0 Comments