भाजपच्या नगरसेवकासह धुळ्यातून आठ जण हद्दपार

होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने भाजपच्या नगरसेवकासह आठ जणांना शहरातून हद्दपार केले आहे. त्यांना २१ मार्चपर्यंत शहरात मज्जाव असेल. दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) सण- उत्सव साजरा करता आले नाहीत. कोरोनाची लाट ओसरल्याने यंदा १७ ते २१ मार्चपर्यंत होळी, रंगपंचमी, तिथीप्रमाणे शिवजंयती साजरी करण्यास शासनाने मुभा दिली आहे. यापूर्वी शहरात सण-उत्सवावेळी उपद्रवी लोकांचे, स्वयंघोषित ग्रुप, टोळ्यांपासून अनुचित प्रकार घडले आहेत. त्यासह संभाव्य धोके टाळणे, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यस्था टिकवून ठेवण्यासाठी आझादनगरचे (Police) पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार आठ जणांना हद्दपार केले आहे.
त्यानुसार जुने धुळे (Dhule), सुभाषनगरातील भाजपचे नगरसेवक देवा सोनार ऊर्फ देवेंद्र चंद्रकांत सोनार, प्रशांत ऊर्फ टिंक्या प्रकाश बडगुजर, बबलू ऊर्फ रुणल दिनेश बडगुजर, गायकवाड चौकातील फायटर ग्रुपचा अध्यक्ष नाना साळवे ऊर्फ ज्ञानसागर विठ्ठल साळवे, कुभांर खुंट व गल्ली नंबर पाच भागातील परदेशी ग्रुपचा अध्यक्ष विकी महादेव परदेशी व त्याचे साथीदार संतोष रवींद्र परदेशी, शिवशक्ती ग्रुपचा अध्यक्ष मंगल गिरधर गुजर, तसेच अमरनगर, मनोहर सिनेमा भागातील उपद्रवी सनी संजय वाडेकर याला १६ मार्चच्या आदेशापासून २१ माचपर्यंत शहरातून हद्दपार केले असल्याचे पत्रकात नमूद आहे. नागरिकांनी होळी, रंगपंचमी शांततेत साजरी करावी. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e