नोकरीच्या आमिषाने ३७ लाखांची फसवणूकब

सांगली : मार्केटिंग फर्ममध्ये वितरणाचे हक्क देतो असे सांगून एका शिक्षकाची मुंबईतील एका कंपनीकडून ३७ लाख ५० हजाराची फसवणूक केली असल्याची तक्रार सांगलीतील संजयनगर पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आली आहे.  सांगलीतील  शिक्षक अनिलकुमार सावंत यांना मासिक ८० ते ९० हजार रुपये नफा मिळेल असे सांगून महेश मार्केटिंग फर्म, कोळसेवाडी या कंपनीमध्ये ४१ लाख गुंतवण्यास भाग पाडण्यात आले. मात्र कंपनीकडून वितरणाचे हक्क अथवा साठा करण्यासाठी काहीही देण्यात आले नाही. यामुळे भरण्यात आलेल्या पैशाची मागणी करण्यात आली. त्या वेळी कंपनीकडून केवळ साडेतीन लाख रुपये परत मिळाले. अन्य रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली. मात्र ते धनादेश वठले नाहीत. यामुळे फसवणूक करण्यात आल्याची तक्रार सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e