पंतप्रधान मोदींचा नवाब मलिकांच्या निमित्ताने शरद पवारांवर निशाणा?; म्हणाले “ही या लोकांची प्रवृत्ती…”जो

राज्यात सध्या ईडी तसंच इतर तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यापासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अप्रत्यक्षपणे यावर भाष्य केलं असून राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार करण्यात येणाऱ्या तपास यंत्रणांच्या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी देशात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग असल्याचं म्हटलं आहे. काही लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

“घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता…”; तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन मोदींचा विरोधकांवर निशाणा

“आपल्या देशात भ्रष्ट्राचार करणाऱ्यांच्या विरुद्ध लोकांमध्ये राग आहे. देशाच्या संपत्तीला लुटून आपल्या तिजोऱ्या भरण्याची प्रवृत्ती काही लोकांची आहे. भाजपाने २०१४ प्रामाणिक सरकारचे आश्वासन देत निवडणूक जिंकली होती. आमचा प्रामाणिकपणा पाहून जनतेने २०१९ मध्ये आणखी आशीर्वाद दिला. भ्रष्टाचार मुक्त भारत करण्याची जनतेला आमच्याकडून अपेक्षा आहे. पण तटस्थ असलेल्या संस्था भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतात तर हे लोक भ्रष्टाचार करणाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्या संस्थाना बदनाम करत आहेत. घोटाळे केलेले लोक एकत्र येऊन आता या संस्थावर दबाव आणत आहेत. तपास यंत्रणांना थांबण्यासाठी हे लोक नवीन मार्ग शोधत आहेत. या लोकांना देशाच्या न्यायापालिकेवरही विश्वास नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आधी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि मग तपासही होऊ देत नाहीत. तपास केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो. ही या लोकांची प्रवृत्ती आहे. हे लोक कोणत्याही भ्रष्ट्राचारी व्यक्तीवर कारवाई झाली की त्याला धर्माचा, जातीचा रंग देतात. कोणत्या माफियाविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला तरी हे लोक त्याला धर्म आणि जातीसोबत जोडतात. मी सर्व प्रामाणिक लोकांना विनंती करू इच्छितो की अशा माफियांना आपल्या समाजातून, संप्रदायातून आणि जातीतून दूर करण्याचा प्रयत्न करावा. हा पंथ मजबूत होईल, समाज मजबूत होईल,” असे पंतप्रधान म्हणाले.

शरद पवार यांनी नवाब मलिकांवरील कारवाईचा निषेध करताना मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचा संबंध दाऊदशी जोडला जातो असं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट नाव घेतलं नसलं तरी यानिमित्ताने त्यांनी शरद पवार तसंच ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधल्याचं बोललं जात आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e