बनावट कागदपत्राद्वारे क्रीडांगणाचे ७ लाख रुपये लाटणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बळवंत पाटील (वय ४०, रा. हळदी, ता. करवीर), राजाराम हरी परीट (५२, रा. बापूरामनगर), परवीर सर्जेराव पाटील (३६, रा. महे, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. विद्यमान उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील (५३, रा. हळदी, ता. करवीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे बनावट कागदपत्राद्वारे क्रीडांगणाचे ७ लाख रुपये लाटणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर बळवंत पाटील (वय ४०, रा. हळदी, ता. करवीर), राजाराम हरी परीट (५२, रा. बापूरामनगर), परवीर सर्जेराव पाटील (३६, रा. महे, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. विद्यमान उपसरपंच बाजीराव निवृत्ती पाटील (५३, रा. हळदी, ता. करवीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहेआरोपींनी बनावट कागदपत्रे, नकाशे, प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायतीचे बनावट ठराव तयार करून जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून गावात नवीन क्रीडांगणासाठी अनुदान मंजूर करुन घेतले आणि त्यानंतर ग्रामपंचायत आणि सरपंचाचे बनावट अधिकारपत्र तयार करून बँकेत जमा झालेले ७ लाख रुपयांचे अनुदान लाटले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर करवीर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. नेमकी कशी केली लूट?
करवीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील संशयित शंकर बळवंत पाटील हा करवीर तालुक्यातील हळदी गावचा माजी उपसरपंच आहे. त्याने गावात अस्तित्वात नसलेल्या जमिनीचे बनावट कागदपत्रे, नकाशे, प्रतिज्ञापत्र, हळदी ग्रामपंचायत सभेचे बनावट ठराव करुन राजाराम परीट, परवीर पाटील यांच्या दोघांच्या मदतीने जिल्हा क्रीडा कार्यालयात कागदपत्रे सादर करुन गावासाठी क्रीडांगण मंजूर करुन घेतले. त्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतीचे बनावट लेटर पॅड तयार करुन बनावट हमीपत्र दिले. जिल्हा क्रीडा कार्यालयाने क्रीडांगणांसाठी सात लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. हे अनुदान ग्रामपंचायतीच्या बँकेच्या खात्यावर जमा झाले. जमा झालेली रक्कम काढण्यासाठी ग्रामपंचायत आणि सरपंचपदाचे बनावट शिक्के, अधिकार पत्र तयार करुन परवीर पाटील याने बेरर चेकने पैसे काढून स्वत:करिता अपहार केला. हा अपहार लक्षात आल्यावर विद्यमान उपसरपंच बाजीराव पाटील यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टात धाव घेतली.
दरम्यान, कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0 Comments