व्यापाऱ्याला लुटणाऱ्या तीन पोलिसांसह चौघांना अटक

पुणे पोलीस दलातील तीन पोलिसांनी व्यापाऱ्याला ४५ लाख रुपयांना लुटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तीन पोलिसांसह चौघांना अटक करण्यात आली आहे.  गणेश िशदे, गणेश कांबळे आणि दिलीप पिलाने अशी पोलिसांची नावे असून ते पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तर, व्यापाऱ्याचा मेहुणा बाबुभाई सोलंकी यालाही अटक केली आहे. या व्यापऱ्याकडे नाशिक येथील एका व्यापाऱ्याने साडेपाच कोटी रुपये मुंबईतील एका व्यक्तीला देण्यासाठी दिले होते. संबंधित व्यापारी कारने  मुंबईकडे येत होते. त्यांची कार भिवंडी येथील दिवा गावाजवळ आली असता पोलिसांचा गणवेश परिधान केलेल्या तिघांनी त्यांची कार अडविली आणि ४५ लाख रुपये घेऊन ते पसार झाले होते.  नारपोली पोलिसांनी या गुन्ह्य़ाचा छडा लावला

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e