मोहाडी येथील सुजय गणेश सोनवणे हा सेंट टेरेसा शाळेत इयत्ता ४ च्या वर्गात शिकत होता. बुधवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेलेला होता. राजू गवळी हा सुजय याला शाळेतून दुचाकीने (क्रमांक एमएच १९ डीएम १११) घरी घेऊन येत होता. मोहाडी रस्त्यावर लांडोरखोरी उद्यानाच्या पुढे उतरतीवर रस्त्यालगत पडलेल्या खडीवर दुचाकी घसरली. यात दुचाकीवर मागे बसलेला सुजय हा रस्त्यावर पडला. याचदरम्यान समोरून येणार्या एमएच २८ बी ७७०३ या क्रमांकाच्या ट्रकने सुजयला चिरडले व त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने लागलीच ट्रक सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेनंतर मोहाडी येथील स्थानिक नागरिकांनी ट्रकवर दगडफेक केली. दरम्यान, मृत सुजयच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला आहे. माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघातग्रस्त दुचाकी व ट्रक ताब्यात घेतला. दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहेत. या अपघातप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मयत जि. प. सभापती प्रभाकर सोनवणेंचा नातू
मयत सुजय हा जिल्हा परिषदेचे सभापती प्रभाकर सोनवणे यांचा नातू तर जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे यांचा पुतण्या आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा परिषद सदस्य तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन माहिती जाणून घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.

0 Comments