सायली शहासने या तरुणीची वसईतील स्टेटस लॉजमध्ये हत्या करून फरार झालेला प्रियकर सागर नाईक याने बिहारच्या मुज्झफर नगर येथील एका लॉज मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता.
वसईच्या वसंत नगरी येथे राहणार्या सागर नाईक (२८) आणि सायली शहासने (२६) या तरुणीचे प्रेमसंबंध होते. शनिवार २६ फेब्रुवारी रोजी तो सायलीला घेऊन वसईच्या स्टेटस लॉजमध्ये आला होता. त्यावेळी सागरने सायलीच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने प्रहार करून हत्या केली आणि फरार झाला होता. त्याने आपला मोबाईल बंद केला होता. त्यानंतर सागरने बिहारच्या मुज्फरनगर येथील आस्था या हॉटेलमध्ये शनिवारी एक खोली घेतली होती. रविवारी रात्री सागरने खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती. तो बिहारवरून सीमा ओलांडून नेपाळला जाण्याच्या प्रयत्नात होता अशी माहिती त्याच्या मोबाईल मधून पोलिसांना मिळाली आहे.
0 Comments