22 मार्च 2022 रोजी अंगडिया खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र गृह विभागाने पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केले.कारवाई रोखण्यासाठीची त्रिपाठी यांची विनंती या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत तत्कालीन मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील निलंबन पुनरावलोकन समितीने दोनदा फेटाळली होती. तथापि, अलीकडेच, त्याने पुन्हा एकदा समितीकडे विनंती केली होती यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देऊन एका अधिकाऱ्याला तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ निलंबनाखाली ठेवता येणार नाही असे म्हंटले होते
भुलेश्वर अंगडिया व्यापाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक ओम वांगटे, निरीक्षक नितीन कदम आणि सहाय्यक निरीक्षक समाधान जमदाडे यांच्या विरोधात 18 फेब्रुवारी 2022 रोजी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांवर खंडणी, दरोडा आणि भारतीय दंड संहितेच्या चुकीच्या पद्धतीने प्रतिबंध या कलमांसह आरोप ठेवण्यात आले होते. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचे पोलीस चौकशीत वांगटे यांनी उघड केल्यानंतर गेल्या वर्षी 9 मार्च 2022 रोजी त्यांचे नाव एफआयआरमध्ये त्रिपाठींचे नाव जोडण्यात आले. या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना 16 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. मात्र सौरभ त्रिपाठी आऊट ऑफ रीच होऊन गेले.दरम्यान, क्राईम ब्रँचने त्रिपाठी विरोधात लुकआउट परिपत्रक जारी केले आणि यूपीमधील त्याच्या गावी टीम पाठवली. 22 मार्च 2022 रोजी, राज्याच्या गृह विभागाने विभागीय चौकशी प्रलंबित असलेल्या त्रिपाठी यांना निलंबित केले
0 Comments