औरंगाबाद: वैजापूर-गंगापूर रोडवर रात्री १० वाजेच्य सुमारास भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ऊसाचा ट्रक व पिकअप व्हॅनची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात तीन मजूर ठार तर एक जखमी झाला. तर जखमीला पुढील उपचारासाठी तात्काळ हलवण्यात आले आहे. तर या अपघातात पिकअपचा अक्षरशः चुराडा झाला आहेयाबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूरकडे जाणारा ऊसाचा ट्रक (एम.एच.18, 2737) आणि समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन (एम.एच.13, सीयू- 1500) या दोन्ही वाहनांची वैजापूर–गंगापूर रस्त्यावर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात पिकअप व्हॅन चा चुराडा होऊन त्यामध्ये प्रवास करणारे अरविंद सुरवसे (वय २८ वर्ष, रा.सोलापूर), अक्षय क्षिरसागर (वय ३० वर्ष, रा.सोलापूर) व गणेश शिरसाठ (वय ३० वर्ष,रा.अहमदनगर) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवशंकर संघवी (रा.चाकूर, जिल्हा-लातूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
अपघाताची तीव्रता एवढी होती जोरात आवाज झाला आणि या अपघातात पिकअपला जोरदार धक्का बसल्याने तिचा चुराडा झाला. अपघाताची माहीत कळताच स्थानिकांनी तात्काळ पिकअपमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्याचा प्रयत्न केला. पण यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर जखमीला बाहेर काढून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दोन्ही गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
0 Comments