पालघर जिल्ह्यातील airtel टॉवरमधून BTS व VIL कार्डाची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

पालघर जिल्ह्यातील डहाणू, सफाळा, मनोर, पेल्हार आणि वालीव या पोलीस ठाणे हद्दीत airtel टॉवरमधून, 4G नेटवर्ककरीता वापरण्यात येणाऱ्या BTS व VIL कार्डाची चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. याबाबत 16 मार्चला वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पालघर : पालघर जिल्ह्यातील airtel टॉवरमधून, 4G नेटवर्ककरीता वापरण्यात येणाऱ्या BTS व VIL कार्डाची चोरी (Card Theft) करणाऱ्या टोळी (Gang)चा वसईत भांडाफोड झाला आहे. वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला हे मोठे यश आले आहे. या टोळीतील 4 आरोपींना अटक केले असून, पालघर जिल्ह्यातील 5 पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. अर्जुन मूलचंद यादव, अनिस हनिफ मलिक, रामसुरत वर्मा, रामजनम यादव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव असून हे सर्व वसई आणि मुंबई परिसरातील राहणारे आहेत.

तांत्रिक बाबींचा आधार घेऊन चोरट्यांना अटक

पालघर जिल्ह्यातील डहाणू, सफाळा, मनोर, पेल्हार आणि वालीव या पोलीस ठाणे हद्दीत airtel टॉवरमधून, 4G नेटवर्ककरीता वापरण्यात येणाऱ्या BTS व VIL कार्डाची चोरी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. याबाबत 16 मार्चला वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक निर्माण केले होते. या पथकाने तांत्रिक बाबींचा आधार घेऊन या सराईत चोरट्यांना अटक केले आहे. या चोरट्यांकडून चोरीस गेलेले AB, BTS व VIL चे 12 कार्ड ही जप्त करण्यात आले आहेत. 

कार्डमधील मेटल, धातू काढून विकायचे

airtel टॉवरमधून, 4G नेटवर्ककरीता वापरण्यात येणाऱ्या BTS व VIL कार्डाची चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. 4 आरोपींना अटक केले आहे. हे आरोपी कार्ड चोरी करायचे आणि त्यातील मेटल, धातू काढून भंगारात विकून आलेल्या पैशातून मौजमजा करायचे हे तपासात निष्पन्न झाल्याचे माहिती वालीव गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e