पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावरील हॉटेल फाउंटनसमोर वन्य प्राण्यांची कातडे विकण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळली. पोलिसांनी एक पथक तयार करून या परिसरात सापळा रचला. हॉटेल समोरील महामार्गालगत मारुती ८०० गाडी (एमएच १५ एएच ७९६३) मध्ये तीन इसम संशयित दिसून आले. यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला.
त्यानंतर त्यांची चौकशी केली. साजिद सुलतान मनियार (वय ३२, रा. देवठाण), शरद मोहन मधे (वय ३२ रा. शेरनखेल) आणि रामनाथ येसू पथवे (वय ४९, रा. शेरनखेल, सर्व ता. अकोले, जि.अहमदनगर) अशी तयांची नावे आहेत. तसेच गाडीच्या डिकीत बिबट्याची कातडी मिळून आली. पोलिसांकडून सर्व जप्त करण्यात आले. तसेच या तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे
0 Comments