मुलींच्या समोरच पत्नीचा गळा चिरून खून

 चाकणजवळील मेदनकरवाडी बापदेववस्ती येथे मंगळवारी पहाटे एका व्यक्‍तीने आपल्या मुलींच्या समोरच पत्नीचा चाकूने गळा चिरून करून खून केला. आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी पहाटे पत्नी अश्‍विनी (वय 23) गाढ झोपेत असताना तिच्या गळ्यावर वार करून पतीने तिचा खून केला.

सचिन रंगनाथ काळेल (सध्या रा. मेदनकरवाडी, चाकण, ता.खेड जि. पुणे, मूळ सातारा) असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मेदनकरवाडी येथे एका इमारतीत काळेल कुटुंब भाड्याने राहात आहे. सचिन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्यांच्यात भांडणही होत असे. मंगळवारी पहाटे सचिनने गाढ झोपेत असलेल्या पत्नीचा आपल्या मुलींसमोर सुरुवातीला गळा आवळून आणि मग चाकूने वार करून खून केला.

घटनेनंतर त्याने रक्‍ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला घरातच ठेवून तीन लहान मुलींना शेजारील इमारतीत राहत असलेल्या आपल्या भावाच्या घरी नेऊन सोडले आणि चाकणमधून पळ काढला. यातील आरोपी पतीचा पोलीस शोध घेत असून या घटनेचा कसून तपास केला जात आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e