पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजहर हा फिर्यादी यांचा पती असून, तो वारंवार फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्याने फिर्यादीचे अश्लील फोटोदेखील मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर आपला इतका खर्च होत असेल तर आपल्याला काही पैसे कमवावे लागतील, असे त्याने सांगितले. त्यावर त्याने तिला मी तुझे अश्लील फोटो इन्स्ट्राग्रामवर अपलोड करून आपण पैसे कमवू, असे सांगितले. त्याने जबरदस्तीने तिला प्रॉपर्टीच्या कागदावर सह्या कर, अन्यथा तलाक देईन, अशी धमकी दिली. तसेच इतर संशयित आरोपींनी लग्नात सामान दिले नाही म्हणून टोमणे मारले. तसेच फिर्यादी यांना मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments