नंदुरबार : गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात शंभर फूट दरीत कोसळले वाहन, एकाचा मृत्यू

घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात वाहन शंभर फुट खोल दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाला. शहादा तालुक्यात ही दुर्घटना घडली असून पोलिसठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यात लेघापाणी ते कोटबांधणी गावाजवळ म्हसावद रस्त्यावर हा अपघात घडला. मंगळवारी संध्याकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान वनकर्मचारी निवृती शिवदास पाटील (४४) कार्यालय तोरणमाळ (ह.मु.श्रीहरीनगर, कांकरीया भवनमागे देवपूर, धुळे) हा सरकारी टपाल देणेकामी राणीपूर येथे स्वतःच्या वाहनाने (क्र. एम. एच.०१ सी. व्ही. ४०३१) येत असताना लेगापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटात अचानक गुरे आडवी आली. गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात  वाहन १०० फुट खोल दरीत कोसळल्याने पाटील यांच्या तोंडाला, डोक्याला व छातीला जबर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत वनपाल संजय हिरामण पवार (४५) तोरणमाळ यांनी म्हसावद पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करण्यात आली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e