प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची लागण; पतीने केली पत्नीची हत्या!

 वर्धा : प्रेमविवाह केलेल्या दांपत्याच्या प्रेमाला संशयाची बाधा झाली आणि त्यातून दुर्दैवी घटना घडली. वर्ध्यातील (Wardha) भुगाव रोडवरील लॉईडस स्टील कंपनी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

चारित्र्याच्या संशयावरून या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद व्हायचा. मात्र, आज या वादाने अचानक उग्ररूप धारण केले. घरात चाललेला वाद अंगणात पोहोचला आणि बघता बघता इम्रान जलालुद्दीन खान (वय 25) याने आपली पत्नी कैकशा इम्रान खान (वय 20) हिला दगडाने ठेचून जिवानिशी ठार (Murder) केले. हि घटना संध्याकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच तात्काळ सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस (Police) निरीक्षक धनाजी जळक आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मृतकाचे शव पोस्टमार्टम साठी सामान्य रुग्णालय वर्धा येथे पाठविण्यात आले असून आरोपी इम्रान खान याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e