कीर्तनकारांचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ; काय घडलं नक्की, वाचा

 औरंगाबादेत कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे

औरंगाबाद : औरंगाबादेत कीर्तनकार असलेल्या एका स्त्री आणि पुरुषाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील 48 वर्षांचे एक कीर्तनकार आणि सिल्लोडच्या  40 वर्षीय महिला कीर्तनकारांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये दोन्ही कीर्तनकार नको त्या अवस्थेत आहेत. कीर्तनकार म्हणवणाऱ्या या दोन्ही व्यक्तींची जिल्ह्यात एकच चर्चा आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीका केली असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध 48 वर्षीय पुरूष कीर्तनकार आणि सिल्लोडच्या 40 वर्षीय महिला कीर्तनकाराचा हॉटेलमधील अश्लील व्हिडीओने जिल्हात खळबळ उडाली आहे. या महाराजानेच हा व्हिडीओ बनवल्याचं या क्लिपमध्ये स्पष्ट दिसत आहे. 3 मिनीटांच्या या व्हिडीओमध्ये हे दोघेही अश्लील चाळे करीत असतांना दिसतंय. गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.. 

नक्की कुठं हे सगळं घडलयं, आणि महत्वाचं म्हणजे हा व्हिडीओ बाहेर कसा आला याचाही आता चर्चा रंगू लागल्या आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलेने विष घेवून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळतंय.  तिच्यावर औरंगाबादेत उपचार सुरु आहेत. 

तर संबंधित पुरुष कीर्तनकार घरीच आहे, कुटूंबियांचे त्याच्यावर लक्ष आहे.. कीर्तनकार म्हणजे समाजाला दिशा देणारे, चांगल वाईट काय आहे ते समजावून सांगणारे म्हणून ओळख असते, औरंगाबाद जिल्ह्यात सुद्दा या कीर्तनकारांनी अनेक ठिकाणी कार्यक्रम केले आहेत, अनेक जण या दोघांनाही चांगलं ओळखतात, मात्र ही व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानं आता कीर्तनकारांच्या नावालाच गालबोट लागल्याची चर्चा आहे, यावर कारवाई करावी अशीही मागणी आता अनेक लोक करताय..


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e