तो मित्रांबरोबर उभा असताना शेख रहिम शेख अमीर, शेख इरफान शेख आमीर, शेख हुसैन शेख आमीर, शेख अफसर शेख अन्वर (सर्व रा. अय्युबनगर) हे धावून आले. शेख रहीमने वाद घालत कुर्हाडीने आदिलच्या डोक्यात वार केला. एकाने तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. तो चुकविण्यात यश मिळाले मात्र इतरांनी दांड्याने मारहाण केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक रत्नपारखी हे करित आहेत.तर, शेख रहीम शेख आमीर (35) याने शेख इस्माईल, सोहेब खान आरिफ खान, शेख सलमान यांनी त्याच दिवशी आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे.
0 Comments