शाहूनगरमध्ये गोंधळ, जमावाने पोलीस जीपची चावी काढली

शहरातील शाहूनगर परिसरात शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास खाद्यपदार्थांच्या गाडीवर गोंधळ झाला. यावेळी रात्री गस्तीवर असलेले चारचाकी वाहन आले असता जमावातील कुणीतरी पोलीस जीपची चावी काढून घेतली. परिसरात तणाव वाढत असल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला होता.
शाहूनगर परिसरात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असतात. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास खाद्यपदार्थ गाडीवर काहीतरी गोंधळ सुरू होता त्याच वेळी शहर पोलीस ठाण्यातील 112 पोलीस मदत वाहन त्याठिकाणी पोहोचले. पोलीस जमावाला समजावत असताना कुणीतरी टारगट मुलांनी पोलीस जीपची चावी काढून घेतली. घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा शाहूनगरमध्ये पोहोचला.
पोलीस जीपची चावी भेटल्याशिवाय पोलीस परिसरातून हटणार नाही अशी भूमिका सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांनी स्पष्ट केली. समाजातील काही सुज्ञ नागरिकांनी मशिदीतून माइकद्वारे आवाहन केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात चावी आणून देण्यात आली. पोलिसांनी एक सिलेंडर, एक हातगाडी आणि काही साहित्य जप्त केले आहे. तसेच गोंधळ घालणाऱ्या काही जणांची नावे देखील घेतली आहेत

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e