यात, लग्नाच्या मिरवणुकीत नवरदेवावर उधळण्यात आलेला गुलाल जवळील मशिदीत पडतो व यावरून हिंदू – मुस्लिम समाजात दंगली उसळतात. यात दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक केली जाते. जाळपोळ केला जातो. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी घोषणाबाजी केली जाते. अशा घटनेचे चित्र उभे केले जाते व सातपूर पोलिस व इतर जवळील पोलीस स्टेशनचे कर्मचारी व अधिकारी सौम्य लाठीमार करून जमा झालेल्या गर्दीला पिटाळून लावतात.
अग्निशमन दलाची वाहने जाळपोळ नियंत्रणात आणतात. अशा स्वरुपाचे हे मॉकड्रिल होते. यावेळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी आगामी सण-उत्सव व बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे मॉक ड्रिल घेण्यात आल्याचे यावेळी सांगितले. तसेच सातपूर शहर परिसरातील समाजातील सर्व जाती व धर्माच्या लोकांनी एकोप्याने राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
0 Comments