'मला आई व्हायचंय पतीला पॅरोलवर सोडा' पत्नीची न्यायालयात धाव !

 एका कैद्याला पॅरोलवर सोडण्यासाठी पत्‍नीने थेट न्यायालयात धाव घेतली. तिने न्यायालयात अजब मागणी केली. या मागणीनंतर 15 दिवसांसाठी त्‍याला पॅरोल देण्यात आला. सध्या हा कैदी अजमेर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे.

पत्नीने अजमेर येथील जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज केला. यामध्ये ती म्‍हणाली, ‘आम्हाला मूल जन्माला घालायचे आहे, त्यासाठी पतीला 15 दिवसांसाठी पॅरोल मिळावा’, असा अर्ज तिने केला. या अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच, भीलवाडा येथील नंदलाल या व्यक्तीला 6 फेब्रुवारी 2019 रोजी एडीजे कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या कैद्याला कोर्टाने 18 मे 2021 रोजी 20 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानंतर त्‍याचे पॅरोल संपल्‍यानंतर तो पुन्हा तुरुंगात परतला 

असा दिला निर्णय

त्‍यांनतर तिने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. यावेळी न्यायाधीश संदीप मेहता आणि फर्जंद अली, जोधपूर यांच्या खंडपीठाने ही याचिका स्वीकारली. यामध्ये न्यायालयाने सांगितले की, ‘कैद्याचे अर्जदाराशी लग्न झाले आहे. वंश जपण्याच्या उद्देशाने आपत्‍य जन्माला घालणे, यास धार्मिक तत्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि विविध न्यायिक निर्णयांद्वारे मान्यता देण्यात आली आहे. तसेच, धार्मिक दृष्टिकोनातून हे प्रकरण पाहिले तर हिंदू तत्त्वज्ञानानुसार आपत्‍ये जन्माला घालण्याचा हक्क आहे. तसेच 16 संस्कारांपैकी पहिला एक संस्कार आहे. त्‍यामूळे न्यायालयाने मागणी केली. आणि 15 दिवसांची रजा मंजूरही केली


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e