औरंगाबाद येथून गुजरात येथे खासगी बसने प्रवास करून जात असताना बसमधील सहप्रवासी व अमोल गुढेकर यांच्यात वाद झाला. यानंतर हतनूरजवळ असलेल्या जयदेव हॉटेल येथे अमोल हा बसमधून उतरला. यानंतर तो कन्नडकडे पायी जात असताना हतनूर जवळील जिल्हा परिषद शाळेसमोरील उड्डाण पुलावर औरंगाबादकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अमोल गुढेकरचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. पंचनामा करून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. सदर घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संग्राम भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हतनूर बीटचे पोलीस सतीश खोसरे, पोलीस संजय आटोळे, पोलीस कैलास करवंदे, पोलीस मित्र संतोष ढोले हे करीत आहेत.
0 Comments