पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर मधील एनडीए रोड येथे लांडगे निवासमध्ये भाडयाने राहणारे रमेश भिसे व नंदिनी भिसे या नवरा बायकोमध्ये मंगळवारी (दि.8) रात्री साडे बारा वाजता भांडण झाले. त्या भांडणानंतर पहाटे रमेश भिसे दारुच्या नशेत झोपले असताना पती हा वांरवार चारित्र्यावर संशय घेतो, काही काम न करता दारु पिण्यास पैसे मागतो व नातेवाईकांसमोर वारंवार अपमान करतो याचा राग येवून नंदिनी भिसे यांनी घरातील नॉयलॉन दोरीने पतीचा गळा आवळून त्याचा खुन केला. नंतर मृत बॉडीस उठवून बसवून पतीच्या गळयात दोरी टाकुन ती दोरी लोंखडी हुकास बांधली. यानंतर पतीने गळफास लावून आत्महत्या केली असा बनाव केला. नंतर मुलास व नातेवाईकांना पतीने गळफास लावून घेतल्याचे दाखवून त्याचे गळयातील दोरी काढून त्यास फरशीवर झोपवून पोलिसांना गळफास घेतल्याची माहिती दिली
ससुन रूग्णालयात पोस्टमार्टम केले असता रमेश मिसे याचा गळा आवळून मारले असल्याचे समोर आले. यावर पोलिसांनी कसून चौकशी केली असता पत्नीचे खून केल्याचे समोर आले. आरोपी नंदिनी भिसे यांना न्यायालयाने 12 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहेत. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल जैतापुरकर, गुन्हे निरीक्षक अर्जुन बोत्रे, सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, दादाराजे पवार, उमेश रोकडे व पोलीस अमंलदार सपोफी वायदंडे, पोहवा, दत्ता नाईकवाडी, अनिल मते, विनोद शिंदे, विनायक बड़े, विजय हजारे यांनी कारवाई केली.
0 Comments