याबाबत अधिक माहिती अशी, देवपूर परिसरात राहणारे करण मोरे आणि किरण शिरसाठ या दोघांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या दोघांना धुळे शहर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते. या आरोपींना न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस पथक गेले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार यांच्या दालना बाहेर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली
यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पोलीस कर्मचारी धर्मेंद्र मोहिते यांच्यावर हल्ला चढवून त्यांना धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे पोलीस पथकातील अन्य कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की करून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments