दिरासोबतचे संबंध लपवण्यासाठी महिलेने आपल्या लहान बहिणीसोबत लावलं त्याचं लग्न; अखेर पोलखोल झाली अन्...

समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, महिलेनं त्यांना सांगितलं की तिच्या बहिणीचं चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. तक्रारदार महिलेला तिच्या नवऱ्याचे तिच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) असल्याचं लग्नानंतर लगेचच समजलं.

गुजरातमधील अभयम हेल्पलाइन समुपदेशकांसमोर नुकतंच एक गुंतागुंतीचं प्रकरण आलं. ज्यात मणिनगर येथील एका महिलेनं आरोप केली की तिच्या मोठ्या बहिणीने विवाहबाह्य संबंध (Extramarital Affair) लपवण्यासाठी कुटुंबीयांनी तिच्या दाजीच्या भावाशी तिचं लग्न लावलं. या प्रकरणाच्या तपशिलात गेल्यावर असं आढळून आलं की, मोठ्या बहिणीने आपल्या पतीच्या भावासोबत असलेले विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी आपल्या धाकट्या बहिणीचं तिच्या दिरासोबत लग्न लावून दिलं.

अभयम हेल्पलाइन समुपदेशकांनी सांगितलं की, त्यांना एका 23 वर्षीय महिलेचा फोन आला. तिने त्यांना सांगितलं की, तिच्या सासरच्या मंडळींकडून तसंच तिच्या बहिणीकडून तिचा छळ होत आहे. समुपदेशकांच्या म्हणण्यानुसार, महिलेनं त्यांना सांगितलं की तिच्या बहिणीचं चार वर्षांपूर्वी लग्न झाले होतं. तक्रारदार महिलेला तिच्या नवऱ्याचे तिच्या मोठ्या बहिणीसोबत प्रेमसंबंध (Love Affair) असल्याचं लग्नानंतर लगेचच समजलं 

तक्रारदार महिलेने समुपदेशकांना सांगितलं की तिने या प्रकरणाची संपूर्ण माहिती तिच्या बहिणीच्या पतीला म्हणजेच तिच्या मेहुण्याला दिली होती. परंतु त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर त्यांनी अभयम हेल्पलाइनवर फोन केला. महिलेनं अभयम हेल्पलाइनच्या समुपदेशकाला सांगितलं की, लग्नानंतरही तिचे पतीसोबत कोणतेही संबंध नाहीत.

नंतर, तक्रारदार महिलेचा पती आणि तिच्या बहिणीने कबूल केलं की, दोघांमधील संबंध उघड होऊ नयेत आणि ही बाब घरातच लपवून ठेवण्यासाठी लग्नाचं नियोजन केलं होतं. मात्र, दोघांमधील विवाहबाह्य संबंध आता संपुष्टात येतील आणि तक्रारदार महिलेला यापुढे कोणताही त्रास होणार नाही, अशी ग्वाही कुटुंबीयांनी अभयम समुपदेशकांना दिली आहे 

2014 मध्ये, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुजरात सरकारने महिलांसाठी 'अभयम हेल्पलाइन 181' सुरू केली होती. कोणतीही महिला 181 अभयम हेल्पलाइनचा वापर कौटुंबिक हिंसाचारासह विविध परिस्थितींमध्ये समुपदेशन, मार्गदर्शन, माहिती आणि बचावासाठी करू शकते. सध्या अहमदाबाद आणि सुरत शहरात १८१ अभयम हेल्पलाइन कार्यरत आहेत.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e