नवनीत राणांचे 'डी गँग'शी संबंध; संजय राऊत यांचा आरोप

नवनीत राणा यांनी दाऊद टोळीशी संबंधित युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचे कर्ज घेतले होते, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईडीने राणा यांच्या कर्जाबाबत तपास करणे गरजेचे आहे. तसेच हा देशाच्या सुरक्षेचा हा प्रश्न आहे, असे राऊत यांनी म्‍हटले आहे. तसेच ईडीकडून या प्रकरणाची चौकशी होईल का? असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

संजय राऊत म्‍हणाले…

युसूफ लकडावाला हा तुरुंगात मरण पावला आहे. आणि त्‍याच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. युसूफ लकडावाला याला मनी लॉन्ड्रिंच्या प्रकरणात अटक झाली होती. तसेच लकडावालाचे दाऊद संबंध होते.

राणा यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेले प्रतिज्ञापत्र पुरावा म्‍हणून संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. राऊत यांचे हे ट्वीट व्हायरल झाले असून आज (मंगळवार) रात्री 10 वाजेपर्यंत त्याला 415 रिट्वीट मिळाले होते. राऊत यांच्या या आरोपामुळे सध्या सुरू असलेल्‍या राणा दाम्‍पत्‍य विरुद्ध शिवसेना या वादाला नवीन वळण मिळालेले असून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहे.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e