सोमवारी (दि.2) शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मालेगाव दौर्यात करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश आले. मोसम नदीवरील जुना पूल पाडून त्याठिकाणी योग्य त्या उंचीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे. त्याचबरोबर सांडवा पूल, द्याने पुलाची उंची वाढविण्यात येऊन वाहतुकीवरील ताण कमी केला जाईल. या व्यतिरिक्त 19
महत्त्वपूर्ण रस्त्यांचे काँक्रिटीकरण होईल. त्यात वैद्य हॉस्पिटल ते जुना आग्रा रोड हा एक वळण आणि पर्याय मार्ग विकसित होईल. जेणेकरून मोसम सर्कलवरील वाहतूक कमी होण्यास मदत मिळेल, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले. मालेगाव महापालिकेच्या रस्ते विकास प्रकल्पास मान्यता मिळाल्याने दळणवळण सुलभ होईल. त्यात शासनाचा 69.78 कोटी (70 टक्के) व मनपाचा 29.91 कोटी (30टक्के) हिस्सा असेल. काँक्रीट रस्त्यांचे आयुर्मान अधिक असते. ते पुन्हा उखडण्याची वेळ येऊ नये,
यासाठी मनपाने भूमिगत गटार, जलवाहिनी, ड्रेनज, केबल आदी कामांचे नियोजन करावे. सर्व संबंधित विभागांनी यास प्राधान्य द्यावे, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी उपमहापौर नीलेश आहेर, माजी उपमहापौर सखाराम घोडके, माजी सभापती राजाराम जाधव, कृउबाचे उपसभापती सुनील देवरे, आयुक्त भालचंद्र गोसावी उपस्थित होते.
0 Comments