या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती वराच्या पेहेराव्यामध्ये बसलेला दिसत आहे. त्याच वेळी, वधू त्याच्या शेजारी हसताना बसलेली दिसत आहे. तसे पाहाता ही नववधू या नवरदेवाच्या मुलीच्या वयाची आहे.
व्हिडीओ पाहून जयमालाचा कार्यक्रम संपल्याचे कळते. यानंतर वधू आणि वर दोघेही स्टेजवर बसलेले दिसतात. शेजारी बसलेल्या वधू-वरांच्या वयात ३५ वर्षांपेक्षा जास्त अंतर असल्याचे पाहायला मिळते.
खरंतर जेव्हा कॅमेरामॅन आपला कॅमेरा या नवरा-नवरीकडे घेऊन जातो, जेव्हा नववधू आपल्या पदराने चेहरा लपवले आणि आपल्या जागेवरुन उठते. त्यानंतर ही नववधू आपल्या चेहऱ्यावरुन पदर काढते आणि हसु लागते
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच, युजर्सनी जोरदार कमेंट्स करायला देखील सुरुवात केली आहे. अनेक तरुणांचं तर असं ही म्हणणं आहे की, इथे आम्हाला आमच्या वयाची एकही तरुणी मिळत नाहीय, इथे तर या वृद्धाला आपल्या पेक्षा अर्ध्या वयाची मुलगी कशी पटली. तर काही लोकांनी पैशांसाठी हे लग्न ठरलं असल्याचं देखील म्हटलं आहे.हा
व्हिडीओ नक्की कुठला आहे, हे कळू शकलेले नाही. परंतु हा व्हिडीओ पाहून अनेक तरुणांच्या भावना दुखावल्या गेल्यात हे मात्र नक्की.
0 Comments