3 मुलांच्या बापाचं शेजारच्या तरुणीवर जडलं प्रेम; बिहारमधून महाराष्ट्रात पळवून आणलं, शेवटी वेगळाच ट्विस्ट

3 मुलांच्या वडिलांचं शेजारी राहाणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडलं. जेव्हा प्रेम फुललं तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातून प्रियकर-प्रेयसीला अटक केली

पाटणा 27 मे : बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातून एक अनोखी प्रेमकहाणी (Love Story) समोर आली आहे. यात एक विवाहित पुरुष शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये बोलं सुरू झालं आणि काही काळातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. याच प्रेमापोटी एक दिवशी दोघंही घर सोडून पळून गेले. आंतरधर्मीय प्रकरणामुळे पोलीसही सतर्क झाले. नंतर दोघांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. सध्या हे प्रकरण आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मुलांच्या वडिलांचं शेजारी राहाणाऱ्या एका तरुणीवर प्रेम जडलं. जेव्हा प्रेम फुललं तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातून प्रियकर-प्रेयसीला अटक केली. हे संपूर्ण प्रकरण जादोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. हे दोघंही वेगवेगळ्या धर्माचे असल्याने पोलीसही सतर्क झाले आणि पूर्ण तयारीनिशी कारवाईला लागले.

मनन अन्सारी असं विवाहित प्रियकराचं नाव आहे. मनन हा जादोपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. मनन अन्सारीने सांगितलं की, तो तीन मुलांचा बाप आहे. त्याचं पत्नीशी अनेकदा भांडण होतं. मननने पोलिसांना सांगितलं की, घरगुती वादाला कंटाळून तो शेजारी राहणाऱ्या त्याच्याच गावातील मुलीशी बोलू लागला. 2 वर्ष संवादाचं हे चक्र सुरू राहिलं आणि नंतर त्याचं रुपांतर प्रेमात झालं.

प्रियकर मनन अन्सारीने आरोप केला आहे की, त्याचं पत्नीसोबत अनेकदा भांडण होतं. त्यामुळे त्याला पत्नीसोबत राहायचं नाही. त्याने सांगितलं की त्याला त्याच्या प्रेयसीसोबत लग्न करायचं आहे. तर दुसरीकडे मुलीनेही मननशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दुसरीकडे, पोलिसांनी दोघांनाही न्यायालयात हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात पाठवलं.

सदरचे एसडीपीओ संजीव कुमार यांनी सांगितलं की, दोघेही प्रौढ आहेत आणि स्वेच्छेने घर सोडून पळून गेले होते. मनन अन्सारीच्या पत्नीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. 164 चा जबाब नोंदवण्यासाठी प्रियकर-प्रेयसीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. गावातील लोक हे प्रकरण अपहरणाचं असल्याची चर्चा करत होते. मात्र पोलिसांना दोघांना ताब्यात घेतल्यानंतर प्रकरणात नवा ट्विस्ट आला आणि हे प्रकरण अपहरणाचं नसून प्रेमाचं असल्याचं उघड झालं.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e