सुनेनं भांडण करू नये म्हणून सोपवलं तांत्रिकाच्या हातात! आयुष्यातले 79 दिवस घडला असा भयंकर प्रकार

महिलेनं पोलिसांसमोर आरोप केला की, एके दिवशी तिच्या सासूने तिच्या जेवणात गुंगी येणारा पदार्थ मिसळून तिला खाऊ घातला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. डोळे उघडल्यावर तिला आपण त्या तांत्रिकाच्या खोलीत असल्याचं दिसलं. जवळच तिचा अडीच वर्षांचा मुलगाही होता. एखाद्यावरच्या श्रद्धेला विवेकाची मर्यादा राहिली नाही की, मग ती अंधश्रद्धा (blind belief) बनते आणि काही लोक त्याचा अवाजवी फायदा घेऊ लागतात. वैवाहिक जीवनातील वाद (family problems) मिटवण्याच्या बहाण्याने ओडिशातील एका तांत्रिकाने एका महिलेवर 79 दिवस बलात्कार (rape) केल्याचा आरोप आहे. यादरम्यान या तांत्रिकानं महिला व तिच्या अडीच वर्षाच्या निष्पाप मुलाला एका खोलीत बंदी बनवून ठेवलं होतं. या महिलेच्या लहान मुलासमोरच तांत्रिक हे घृणास्पद कृत्य करत असे. पोलिसांनी या बंद खोलीतून महिला आणि तिच्या मुलाची सुटका केली. मात्र, तांत्रिक पळून जाण्यात यशस्वी झाला. पीडित महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पती आणि सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या म्हणण्यानुसार, 2017 मध्ये तिचं लग्न झालं होतं. तेव्हापासून हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. वैवाहिक जीवनातील वाद मिटवण्यासाठी तिचा पती आणि सासरच्यांनी एका तांत्रिकाशी संपर्क साधला. तांत्रिकानं त्यांना विश्वास दिला की, जर त्यांनी त्या महिलेला काही महिने त्याच्याकडे ठेवलं तर, सर्व काही ठीक होईल. मात्र, महिला यासाठी तयार नव्हती. महिलेनं पोलिसांसमोर आरोप केला की, एके दिवशी तिच्या सासूने तिच्या जेवणात गुंगी येणारा पदार्थ मिसळून तिला खाऊ घातला. त्यामुळे ती बेशुद्ध झाली. डोळे उघडल्यावर तिला आपण त्या तांत्रिकाच्या खोलीत असल्याचं दिसलं. जवळच तिचा अडीच वर्षांचा मुलगाही होता. तांत्रिकाने निष्पाप मुलासमोरच तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. हे सर्व 79 दिवस चालले. महिलेच्या म्हणण्यानुसार, 28 एप्रिलला तांत्रिक त्याचा फोन खोलीमध्ये विसरला होता. संधी पाहून महिलेनं तिच्या माहेरच्या लोकांना बोलावलं. महिलेच्या तोंडून संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलीस तांत्रिकाच्या अड्ड्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 376 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेनं एफआयआरमध्ये तिचा पती, त्याचा भाऊ आणि इतर सासरच्या लोकांची नावेही नोंदवली आहेत. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e