आदर्श नगर परिसरात एसएसडी हाईट्समध्ये रहिवासी राजेश सावंतदास पंजाबी यांचे इमारतीचे काही बांधकाम अद्याप बाकी असून खाली सुरक्षारक्षक देखील परिवारासह राहतो. गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात तीन माथेफिरू तरूणांनी एक साडी ३ दुचाकी आणि एक चारचाकीच्या बोनेटमध्ये अडकवली. नंतर पेट्रोल ओतून त्यांनी वाहनांना आग लावली. या आगीमध्ये दुचाकी क्रमांक एमएच १९. ४३९९, एमएच १९. ४८९६ आणि एमएच १९. ३७५६ या पूर्णपणे खाक झाल्या आहेत. तसेच चारचाकी क्रमांक एमएच १९ सिव्ही ७१०६ चा देखील पुढील भाग व चाक जळून नुकसान झाले आहे.
एका पाठोपाठ वाहने पेटविल्याच्या घटना...
दुचाकी जळत असताना अचानक जोरात आवाज झाला. त्यामुळे पंजाबी यांच्या घराच्या सुरक्षारक्षकाला जाग आली. त्याने लागलीच मालक राजेश पंजाबी यांना फोन केला आणि वाहने जळत असल्याची माहिती दिली. राजेश हे कुटूंबीयांसह खाली आले. पण आगीचे लोळ एवढे होते की पायऱ्यांच्या खाली उतरणे सुध्दा त्यांना कठीण झाले होते. अखेर शेजारच्यांच्या मदतीने वाहनांवर पाणी टाकून आग विझविण्यात आली.

दरम्यान, पंजाबी यांच्या वाहनांना आग लावल्यानंतर माथेफिरू तरुणांनी जवळच असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी क्रमांक एमएच १९ के ४२३६ देखील जाळण्याचा प्रयत्न केला. आगीत दुचाकीचे सीट आणि मागील काही भाग जळाला आहे. दुचाकी मालक विलास माधव शिरसाळे हे समतानगरमधील रहिवासी असून सृष्टी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या योगेश कलंत्री यांच्या वाहनावर ते चालक आहे. रात्री ते दुचाकी कंपाउंडमध्ये लावून घरी गेले होते. दरम्यान, मध्यरात्री कलंत्री हे घराबाहेर आल्यानंतर
त्यांना दुचाकी जळत असल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी लागलीच पाणी टाकून आग विझविली.
एकाच परिसरात संपूर्ण थरार...
तसेच, डीमार्टच्या मागील बाजूला असलेल्या आराध्य अपार्टमेंट डॉ.मिलिंद मधुकर जोशी हे राहतात. मध्यरात्री २.३० ते ३ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू तरुणांनी त्यांच्या कंपाउंडमध्ये लावलेली चारचाकी क्रमांक एमएच

१९ एपी १३४५ जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आगीत चारचाकीचा मागील भाग व टायर जळाला आहे. टायरचा आवाज झाल्यानंतर जोशी यांना जाग आली आणि घटना समोर आली. तेव्हा त्यांना तसेच समोर ओम नमः शदाराम इमारतीत राहणारे ओम प्यारप्यानी यांची चारचाकी क्रमांक एमएच १९ सीयू ९४४४ देखील जाळण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले. या चारकीचे वरचे भाग काही प्रमाणात जळाले होते.
आराध्य अपार्टमेंटजवळच असलेल्या जय गुरुदेव अपार्टमेंटमध्ये जगदीशलाल गुरूदासमल नाथानी व पवन विजय हेमनानी राहतात. अपार्टमेंटच्या कंपाउंडमध्ये नाथानी यांची एमएच १९. ४९७७ व पवन हेमनानी यांची वाहने पेटवल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबानी काही मिनिटात घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळ गाठून आग विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे विक्रांत घोडस्वार, नंदकिशोर खडके, वसंत दांडेकर, भगवान जाधव, रवी बोरसे यांनी विझविण्यासाठी सहकार्य केले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळांची
पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण घटनांची माहिती घेतल्यानंतर कोणत्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत याची तपासणी केली. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहे. तेथे जाऊन फुटेज तपासण्यात आले. एका ठिकाणच्या घटनेत आग लावताना तसेच आग लावल्यानंतर कुंपणाची भिंत ओलांडून पसार होताना माथेफिरू कैद झाले आहेत. त्यावरून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला.
0 Comments