पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित सोहम प्रविण वनमाळी (२१, रा. टाकळीरोड, द्वारका) याने नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत राजीवनगर परिसरात पीडितेचा विनयभंग केला. संशयित सोहम याने पीडितेच्या इच्छेविरोधात जवळीक साधून व्हॉट्सअपवर अश्लिल मेसेज पाठवले. त्याचप्रमाणे तिस व्हिडीओ कॉलवरून अश्लिल कृत्य करण्यास भाग पाडून व पैशांची मागणी केली. तसे न केल्यास सोहमने पीडितेस बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत संशयित नितीन कैलास खातळे (रा. करुळे, ता. इगतपुरी) याने पाथर्डी फाटा येथील दामोदर नगर परिसरातील १६ वर्षीय मुलीस लग्नाचे आमीष दाखवले. सुमारे वर्षभरापासून नितीनने पीडितेचा पाठलाग करून ओळख वाढवली. तिला मोबाइल देत तिच्याशी संपर्क ठेवला. याबाबत पीडितेच्या पालकांनी नितीनला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नितीन विरोधात गुन्हा दाखल केला असून इंदिरानगर पोलिस तपास करीत आहेत.
0 Comments