पत्नीच्या मृत्यूनंतर काही तासातच पतीची आत्महत्या; सोबतच निघाली अंत्‍ययात्रा

पाचोरा  : येथील हनुमाननगरातील अत्यंत गरीब कुटुंबातील महिलेचा झोपेतच मृत्यू झाल्याने आपण निराधार झाल्याच्या भावनेतून महिलेच्या पतीनेही अवघ्या काही तासात चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या पाचोरा येथील हनुमाननगरात विष्णू पाटील (वय ६५) हे भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत. त्यांनी अनेक वर्षे गवंडी काम केले. त्यांच्या पत्नी किरणबाई पाटील या देखील धुणीभांडी करून संसाराचा गाडा ओढत होत्या. या दांपत्याला मुलबाळ नव्हते. दोन दिवसांपूर्वी किरणबाई पाटील या नेहमीप्रमाणे कामे करून घरी परतल्यानंतर दुपारी थोड्या झोपल्या असता, त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे आपण आता निराधार झाल्याची भावना विष्णू पाटील यांच्या मनात बळावल्याने त्यांनी चिठ्ठी लिहून पत्नीच्या निधनानंतर अवघ्या काही तासात घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

आता आधार उरला नाही..

‘पत्नीचा मृत्यू झाल्याने मला आता आधार उरलेला नाही. त्यामुळे मी आत्महत्या करून जीवन संपवत आहे. माझ्यावर कोणीही अंत्यसंस्कार करावे’ अशी चिठ्ठी लिहून विष्णू पाटील यांनी गळफास घेतला. काही कामानिमित्ताने शेजारी त्यांच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. दोघांची एकत्रित अंत्ययात्रा काढून विष्णू पाटील यांच्या चुलत भावाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e