२१ एप्रिल पासून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणातून ३ प्रश्न विचारण्यात आले होते. दोन आठवड्यांपर्यंत चाललेल्या सर्वेक्षणातून दिल्लीतील ११ लाख ५४ हजार २३१ लोकांनी त्यांचे मत नोंदवले. सर्वेक्षणातून ९१% नागरिकांनी भाजपला, ८% नागरिकांनी कॉंग्रेसला तर, १% सर्वेक्षणदात्यांनी इतर पक्षांना गुंडशाही आणि धार्मिक दंगलींसाठी जबाबदार धरल्याचे सिसोदिया म्हणाले.
सर्वाधिक अशिक्षित लोक भाजपमध्ये असल्याचे मत ८९% लोकांनी नोंदवले. ५% लोकांनी कॉंग्रेस, २% लोकांनी आम आदमी पक्ष आणि ४% लोकांनी इतर पक्षामध्ये सर्वाधिक अशिक्षित लोक असल्याचे मत नोंदवल. विशेष म्हणजे ७३% लोकांनी आम आदमी पक्षात सर्वाधिक सभ्य, सुशिक्षित लोक असल्याचे मत नोंदवले. तर, १५% नागरिकांनी कॉंग्रेस आणि १०% लोकांनी भाजप, २% नागरिकांनी इतर पक्षांमध्ये सुशिक्षित आणि सभ्य लोक असल्याचे मत नोंदवले आहेत, असे सिसोदिया म्हणाले.
0 Comments