प्रकाश रावसर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुलगा सागर हा संकेत कोरडे याचा बालपणीचा मित्र आहे. संकेत कोरडे याचे भोये यांच्या घरातील एका मुली सोबत एक वर्ष पूर्वी प्रेम संबंध होते. शनिवारी कोरडे आणि भोये कुटुंबियातील बायकांमध्ये भांडण झाले. हे भांडण सुरू असताना दोन्ही कुटुंबातील पुरुषांमध्ये एकमेका सोबत भांडण झाले. सागरने संकेत यास समजून सांगत तू भांडण करू नको पोलिसांत तक्रार दे असे सांगितले. याचा भोये कुटुंबियांना राग आला. संकेत पोलीस ठाण्यातून आल्या नंतर संशितानी सगार वर हल्ला केला.
छातीत चाकू लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुंबई नाका पोलिसांना संशयितांना अटक केली आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहो यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मयत सागर संकेत बालपणीचे मित्र आहे.मित्राच्या प्रेम पोटी त्याने भांडण सोडवत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला पण ही मध्यस्थी त्याच्या जीवावर बेतली.
0 Comments