धडगाव (Dhadgaon) तालुक्यातील कुंडल येथील रहिवासी ललिता पाडवी (वय 28) हिचा ३ मे रोजी हरणखुरी ते सोमाना दरम्यान अज्ञातस्थळी (Nandurbar News) पुलाखाली मृतदेह आढळून आला होता. ललिताची हत्या दोन दिवसांपूर्वीच झाल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने शवविच्छेदनानंतरही तपास यंत्रणेला ठोस पुरावे उपलब्ध न झाल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. नंदुरबार प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत धडगाव पोलीस (Police) व स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने वेगवेगळी पथके तयार करून तपास सुरू केला होता.
फोन कॉलवरून सुरू केला तपास
दरम्यान ललिताच्या मोबाईलवर आलेल्या कॉलनुसार तपास सुरू केला होता. यात ललिताच्या बहिणीचा नवरा यांचादेखील फोन आलेला असल्याने सुरुवातीला त्याची चौकशी करून त्यांची झाडाझडती घेण्यात आली. परंतु पोलिसांना किल्षट मिळाले नसल्यामुळे सोमाना येथील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यात एका तरुणाचे ललिताशी प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु सदर तरुणांच्या तपासात ललिताचा खून त्यांनी केला नसल्याचे उघड झाले होते.
लग्नास नकार दिल्याने दाबला गळा
दरम्यान पाचव्या दिवशी धडगाव पोलिसांच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत ललिताचा खून झालेल्या रात्री मुंदलवड येथील मनोज भिमसिंग वळवी या इसमाशी असल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मोहन याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पूर्ण हकीगत पोलिसांना सांगितली. मोहन हा विवाहित असून देखील ललिताशी त्याचे संबंध होते व लग्नासाठी आग्रह धरत होता. परंतु ललिताने नकार दिल्यामुळे मनोजने ललिताला ओढणीच्या साह्याने गळा दाबून खून केला असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित आरोपी मनोज याला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. सदर कारवाई प्रभारी पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धडगाव पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथकांनी कारवाई बजावली आहे.
0 Comments