गुजरात राज्यातून ऊसतोड कामगारांना घेऊन येणाऱ्या आयशर ट्रकने (जीजे १९ एक्स ८६६ शेणपूर फाट्याजवळ कांदे घेऊन पिंपळनेरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेने ट्रक उलटला.
या अपघातात उज्वल अनिल (वय १६), वसंत नथू अहिरे ५०), किरण संजय २५), सिंधूबाई संजय गायकवाड ५०), सुंदरबाई दत्तू पवार (५०), चित्राबाई साहेबराव सोनवणे (५५), सर्व रा.धाडणे), छोटी शालिग्राम सोनवणे (३५), विशाल शालिग्राम सोनवणे (११), भारती शालिग्राम सोनवणे (१५) सर्व. रा. महीर), अरुणा उत्तम ठाकरे ३०, रा.आमखेल) हे जखमी झाले. त्यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर गंभीर जखमी विशाल सोनवणे भारती सोनवणे, किरण गायकवाड, अरुण ठाकरे यांच्यावर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून धुळ्याला हलविण्यात आले. याबाबत साक्री पोलिसांत दुपारी अपघाताची नोंद झाली आहे.
0 Comments