मधुरा बालाजी लोणीकर (वय २२) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर बालाजी वैजीनाथ लोणीकर (वय २९) असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लोणीकर दाम्पत्य हे मूळचे बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील रहिवासी आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते औरंगाबादेत भानुदास नगर येथे किरायाच्या घरात वास्तव्यास होते. आरोपी बालाजी हा खासगी कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून कामाला आहे.
मधुरा आणि बालाजी यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक तीन वर्षीय मुलगा आहे. मधुरा मनासारखं वागत नाही. सांगितलेले काम ऐकत नाही, असे बालाजीला वाटायचे त्यामुळे नेहमीच दोघांचे खटके उडायचे. आज देखील दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर बालाजीने उशीने मधुराचे तोंड दाबून तिची हत्या केली.
0 Comments