बॉम्बस्फोटातील आरोपीला नागपुरातून अटक ; पिस्तूल आणि काडतूस जप्त

 नागपूर : बिहार मध्ये बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आरोपीकडून एक पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त करण्यात आले.मो. तनवीर मो. मंजूर (32) असे आरोपीचे नाव आहे. बिहार मधील भागलपूर न्यायालयात आरोपी तनवीर ला  १७ मे ला बिहार पोलिस घेऊन जात असताना त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला होता. तेथून तो थेट कोलकत्ता येथे गेला. त्यानंतर तो नागपुरात आला. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भानखेडा परिसरात तो भाड्याने राहत होता. तहसील पोलिसांना माहिती मिळताच आज सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e