धुळे येथील शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार मंत्री राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला होता. या प्रकरणात एका वर्षानंतर धुळ्याच्या न्यायालयात राणे यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. यात केंद्रीय मंत्री राणे यांच्या वतीने ॲड अनिकेत निकम यांनी न्यायालयात बाजू मांडली.
यावेळी मंत्री राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्यामुळे कोणतीही तेढ निर्माण झाली नसल्याची बाब त्यांनी न्यायालयाच्या
निदर्शनास आणून दिली. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात त्यांना धुळे पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले नसल्याचेही न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. सोनवणे यांनी बाजू मांडली. यात अटकपूर्व जामीन फेटाळण्यासाठीचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.
0 Comments