शहरात सण समारंभ उत्सवाच्या काळात काही अनुचित घटना होऊ नये त्यानुसार धुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर, आझादनगर व चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याच्या
वतीने उपविभागीय दंडाधिकारी यांना हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले. या प्रस्तावावरून उपविभागीय दंडाधिकारी यांनी १२ उपद्रवींना गुरुवार (दि.५) पर्यंत शहरातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. यात योगेश भोकरे, राजेंद्र मराठे ऊर्फ राजू महाराज, संजय शर्मा,
मुस्ताक शहा गुलाब शहा, शरीफ शहा गुलाब शहा, शरीफ शहा भोलू शहा, समीर अन्सारी, मोहम्मद सुभान साजिद हैदर शहा, परशुराम रघुवीर परदेशी, मोहम्मद सादिक मोहम्मद सलीम, धीरज रामेश्वर परदेशी, वसीम सलीम रंगरेज ऊर्फ वसीम वड्या या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना शहरातून हद्दपार करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0 Comments