मुलींनी दिला पित्यास मुखाग्‍नी; मुलगा नसल्‍याने कर्तव्‍य पाडले पार

पाचोरा (जळगाव) : अलीकडच्या काळात मुलांच्‍या बरोबरीचे स्थान मुलींना दिले जाते. मुलगा वंशाचा दिवा असला तरी मुलींनाही वंशाची पणती मानले जात आहे. मुलीदेखील सर्वच क्षेत्रात कर्तबगारी सिद्ध करीत आहेत. उच्चशिक्षित मुली कुटुंबाची (Jalgaon News) जबाबदारी पार पाडतांना दिसत आहेत. त्यामुळे मुलगा नसला तरी मुली त्यांची जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी होत आहेत. असाच काहीसा प्रकार सावखेडा येथील अभियंता असलेल्या दोघा भगीनींसंदर्भात अनुभवायला मिळाला. त्यांनी मृत पित्याच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पाडून मुलगा व मुलगी समान असल्याचे सिध्द केले
सावखेडा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, पाचोरा येथील एम. एम. कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य, पाचोरा (Pachora) कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक मंडळाचे सदस्य प्रा. एस. डी. पाटील (वय 64) यांचे अल्पशा आजाराने पुणे (Pune) येथील खासगी रुग्णालयात (Hospital) उपचारा दरम्यान निधन झाले. सावखेडा या राहत्या गावी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलींनीच केला संपूर्ण विधी

त्यांना दोन मुली असल्याने त्याच्या अंत्यसंस्काराचा संपूर्ण विधी प्रांजली व भाग्यश्री या उच्चशिक्षीत मुलींनी पार पाडला. पित्याचे अंतिमस्नान व पूजन, खांदा व अग्निडाग देणे असा संपूर्ण विधी मुलींनी केला. दोघा भगिनींचे हे कार्य पाहून सारेच अवाक झाले. मुलगा व मुलगी यात कोणताही फरक नाही असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. प्रांजली व भाग्यश्री या भगिनींचे कौतुक होत आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e